विशेष प्रतिनिधी
आपण मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, कारण देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे, देवाभाऊ पुढचे 100 वर्षे मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना करा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. ( Pray that Devabhau becomes the Chief Minister for the next 100 years Nitesh Rane appeals to the Koli brothers)
वेसावा खाडीजवळ स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन राणेंनी चर्चा केली. यावेळी राणे म्हणाले, मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा मिळावा ही मागणी वर्षानुवर्ष आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले आणि पहिल्या 100 दिवसात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. आपण आधी सरकार म्हणून मदत मागायला जायचो तेव्हा अधिकारी हात आकडते घ्यायचे, तुटपुंजी मदत द्यायचे. पण, डहाणूमध्ये 1 कोटी 89 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यावेळी मी मदत पुनर्वसन मंत्र्यांकडे गेलो आणि नुकसान जास्तीत जास्त भरून देण्याचे ठरविले. जर आधीच्या अनुषंगाने मदत केली तर मच्छिमारांचा अपमान आहे. मी मुख्यमंत्र्यांना संगितले त्यांनी आदेश दिले आणि आता 100 टक्के नुकसान भरपाई देण्याचे ठरविले. मी गुजरातवरुन थेट तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आता कोणीतीही चिंता करू नका जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ.
आम्ही ड्रोनने पाहणी करत आहोत, जेणेकरून एलईडी वाल्यांच्या ढुंगणाला आग लागेल. जर कोणताही अधिकारी कोणाकडूनही वजन घेत असेल तर त्याला असा जिल्हा देईल की पुन्हा मासे दिसणार नाहीत. मी पूर्णपणे कार्यक्रम करणार आहे, आम्ही कोणालाही सोडणार नाही, अशा शब्दात राणेंनी अधिकाऱ्यांना इशाराही दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, आपण मच्छी मार्केट बनवत आहोत, तिथे कोळी भवनही असेल तसा प्लान तयार होत आहे. 489 करोड रुपयांची माझ्या खात्याकडून पूर्णपणे तरतूद आहे. इथे पर्यटन कसे वाढेल, तरुणाईला रोजगार कसा मिळेल असा प्लॅन आहे. प्लॅस्टिक मुक्त कोळीवाडे ही मोहीम सुरू करायची आहे. गाळ आम्ही काढू पण प्लास्टिक मुक्त कोळीवाडे करा, मी सगळ्या निवेदनाला न्याय देण्याचे काम करेल. आइस फॅक्टरी पाहिली ती तयार करण्याची आमची तयारी आहे, तुमचा प्रस्ताव पाठवा कार्यक्रम करू. ज्यावेळी आइस फॅक्टरी होईल तेव्हा पूर्ण कोळी वेषात नाचत गाजत येईल.