विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोर्शे कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेले ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याला किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटशी संबंधित एका प्रकरणातही पोलिसांनी अटक केली आहे. ( पुणे पोर्शे कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेले ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे याला किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटशी संबंधित एका प्रकरणातही पोलिसांनी अटक केली आहे. ( Pune Porsche car case Dr. Ajay Taware arrested in kidney transplant racket ) )
पोर्शे कार प्रकरणात डॉ. तावरे यांनी आरोपीच्या रक्तातील नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप आहे. 2022 मध्ये हे किडनी रैकेट समोर आलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात तावरे याला देखील सहआरोपी करण्यात येणार आहे.
रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेट प्रकरणात शहर गुन्हे शाखेने तावरे यांना ताब्यात घेतले आहे. सध्या तावरे येरवडा तुरुंगात आहेत. पुण्यात 2024 मध्ये मे महिन्यात घडलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांशी छेडछाड केल्याचाही डॉ. तावरे यांच्यावर आरोप आहे. पण किडनी रॅकेट संदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये, तावरे हे किडनी प्रत्यारोपणाला मान्यता देणाऱ्या प्रादेशिक अधिकृतता समितीचे प्रमुख होते. पुणे पोलिसांनी मे 2022 मध्ये 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीचा वापर केल्याचा आरोप होता.
रुबी हॉल क्लिनिकचे किडनी रॅकेट 2022 मध्ये उघडकीस आले. कोल्हापुरातील एका महिलेने बनावटरित्या एका पुरुषाची पत्नी असल्याचा दावा केला. या पुरुषाला किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. या महिलेने 2022 एका तरुणीला किडनी दिली. त्यानंतर त्या तरुणीच्या आईने त्या पुरुषाला किडनी दिली. अशा पद्घतीने किडनी तेव्हाच दिली जाते, जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकामधील कोणचेही रक्त त्या रुग्णासोबत जुळत नसेल. 29 मार्च 2022 रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेदरम्यान पैशांवरून झालेल्या वादानंतर 4 दिवसांनी महिलेने तिची खरी ओळख उघड केली होती.