विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांची सरबत्ती करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मात्र त्यांच्या बरळल्याने राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. (Randeep Surjewales controversial statement Serious allegations against BJP over Pahalgam attack but false and misleading claims)
सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, “जेव्हा भाजपा सत्तेत असतो तेव्हाच देशात मोठे दहशतवादी हल्ले का होतात?” त्यांनी १९९९ मधील आयसी ८१४ अपहरण, संसदेवरील हल्ला, पठाणकोट, उरी, पुलवामा, नगरोटा, अमरनाथ यात्रा आणि अलीकडील पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर “न बोलावता पाकिस्तानात गेले आणि त्याबदल्यात देशाला पठाणकोटसारखा हल्ला मिळाला,” असा आरोप केला. इतकेच नव्हे तर भाजपाने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ ला भारतात बोलावल्याचा दावा करून थेट देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.
सुरजेवाला म्हणाले, जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आयसी ८१४ या विमानाचं अपहरण केलं होतं, तेव्हा मौलाना मसूद अझहर आणि इतर दहशतवाद्यांना काश्मीरमधील तुरुंगातून सोडवून तेव्हाच्या भाजपा सरकारमधील परराष्ट्रमंत्री कंधाहारला सोडून आले होते, यावर भाजपा नेते काय उत्तर देणार. जेव्हा देशात भाजपाचं सरकार होतं, तेव्हा ते एवढं कमकुवत होतं की, देशाच्या संसदेवरही हल्ला झाला होता.जेव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. केवळ हवाई तळच नाही तर आमचं पोलीस ठाणंही उडवलं. उरीमध्ये लष्करी तळावर हल्ला झाला, तेव्हाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होते. पुलवामामध्ये थेट हल्ला झाला होता. तेव्हा आमच्या लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केलं गेलं, हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान चित्रपटाचं चित्रिकरण करत होते. त्याशिवाय नगरोटा येथील लष्करी तळ, अमरनाथ यात्रा आणि रियासी येथेही अशाच प्रकारचे हल्ले झाले, तर आता पहलगाम येथे हल्ला झाला
नरेंद्र मोदी हे मागच्या ७५ वर्षांतील पहिले असे पंतप्रधान आहेत. जे न बोलावता पाकिस्तानमध्ये न बोलावता मेजवानीसाठी गेले. त्या बदल्यात आपल्याला पाकिस्तानकडून पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला भेट म्हणून मिळाला. मागच्या ७५ वर्षांत भाजपा असा एकमेव पक्ष आहे, ज्याने पाकिस्तानच्या कुख्यात आणि बदनाम आयएसआयला भारतात बोलावलं होतं. तेव्हाही अमित शाह गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होते. एकदा नाही तर अनेकदा भाजपा आणि आयएसआयचे संबंध असल्याचे समोर आले आहे,
भाजपाने या आरोपांचा तीव्र निषेध करत सुरजेवाला यांना ‘ सत्यापासून दूर गेलेले नेते’ अशी उपमा दिली आहे. भाजपाचे प्रवक्ते म्हणाले, “हे आरोप हास्यास्पद आणि नितांत खोटे आहेत. रणदीप सुरजेवाला यांना पाकिस्तानप्रेम आणि मोदीद्वेष झाकता न आल्याने त्यांनी आपल्या पक्षाची प्रतिमा रसातळाला नेली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकसारख्या ठोस कृती झाल्या आहेत, जे काँग्रेसच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळाले नाही.”