विशेष प्रतिनिधी
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या पुण्याच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुणीवर बलात्कार आणि नंतर गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ( Rape case against son of former BJP corporator in Pune)
करण दिलीप नवले असे आरोपीचे नाव आहे. माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा तो मुलगा आहे. करण याने 28
वर्षीय तरुणीवर लग्नाचे आश्वासन देऊन अनेकदा बलात्कार केला आणि नंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.
पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात करण विरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तिने आरोप केला आहे की करण याने 2021 ते 2024 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले होते. करण नवले याची आणि पीडित तरुणीची एका जीममध्ये 2021 मध्ये ओळख झाली.
त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान नात्यात असतांना करणने तरुणीवर अनेक वेळा बलात्कार केला. लग्नाची विचारणा केली असता टाळाटाळ केल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हंटले आहे.
करणने ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे. थोडासा वेळ दे’ असं म्हणत तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर 2024 मध्ये तरुणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले. 16 फेब्रुवारी 2025 रोजी आळंदीत त्यांनी लग्न केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
पीडितेने करणची आई, माजी भाजप नगरसेविका राजश्री नवले यांच्याशी त्यांच्या मुलाच्या कृत्याबद्दल माहिती दिली तेव्हा तिला धमकी देण्यात आली. पुणे सोडून जाण्यास सांगण्यात आले. पोलिसांनी करणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.