विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात 11 हजार पोलिसांच्या पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात पोलीस भरतीचे इतिहासातील रेकॉर्ड झाले आहे.
( Recruitment for 11 thousand police posts in the state)
मुख्यमंत्री म्हणाले, मागील तीन वर्षात 38 हजार आठशे दोन जागांसाठी पोलीस भरती झाली. 13 हजार 560 पोलिस पदांसाठी नवीन प्रस्ताव आणलेला आहे. हा राज्यातील पोलिस भरतीच्या इतिहासातील रेकाॅर्ड आहे, यापुर्वी राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती झाली नाही .
पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खूप महत्त्वाची भूमिका असते आणि राज्यात वाढती लोकसंख्या पाहता आता पोलिसांची संख्या ही वाढवणे आवश्यक आहे या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे. अकरा हजार जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या संदर्भात गृह विभागात कडून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरतीमध्ये बँड समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई तसेच राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे.