विशेष प्रतिनिधी
जळगाव : मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील. मी अजूनही त्यांना आव्हान देतो. त्यांनी फक्त एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडतो, असे आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. ( Relationship with female IAS officer Give proof will quit politicsGirish Mahajan challenges)
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला आहे. याचे कॉल रेकॉर्डिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे असल्याचेही ते म्हणाले आहेत.
यावर संतप्त प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले,
त्यांनी पुरावे लोकांना दाखवावेत. त्यांनी नुसतं बडबड करू नये. यांना पुरावे दिले, त्याला पुरावे दिले, असे करू नये. खोटं बोलतानात्यांना लाज वाटत नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये. मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. खडसे यांनी एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला. त्यातूनच हे सगळं समोर आलं आहे.
एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की, महाजन आणि एक महिला आयएएस अधिकारी यांच्यात संबंध आहेत. याची कल्पना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनादेखील आहे. विशेष म्हणजे अमित शाहा आणि माझी कधी भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील या आरोपांबाबत विचारणार आहे, असेही खडसे म्हणाले.