विशेष प्रतिनिधी
पुणे : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव होऊन भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला. यामुळे भाजप उद्विग्न झालेले राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी तर काँग्रेस आणि आप भाजपची ‘बी टीम असल्याचे म्हटले आहे. (
B Team’ of Congress and AAP BJP, Rohit Pawar’s angry reaction)
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. अगदी मुख्यमंत्री राहिलेले आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला .
याबाबत रोहित पवार यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत म्हटले आहे की दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष सिसोदिया ७०० मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना ७३५० मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास ३४०० मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना ४५०० हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा ११००० मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला १८००० मते मिळाली. २० हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे.
काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळत नकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन इंडिया आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढतील का? हा खरा प्रश्न आहे, असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.