विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि मुंबईकरांचा अभिमान असलेल्या रोहित शर्मा याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या, तसेच रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील योगदानाबद्दल फडणवीस यांनी विशेष गौरव व्यक्त केला. ( Rohit Sharma pays a goodwill visit toVarsha residence Chief Minister Devendra Fadnavis wishes him well for his new journey)
“माझ्या ‘वर्षा’ निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे स्वागत करून, त्याच्याशी संवाद साधताना अतिशय आनंद झाला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासासाठी मी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या,” असे फडणवीस यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले.
मुंबईच्या रस्त्यांवरून आपला क्रिकेट प्रवास सुरू करणाऱ्या रोहितने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली खास छाप सोडली. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या संयमित फलंदाजी, नेतृत्वगुण आणि अचूक निर्णयक्षमतेमुळे तो एक ‘थिंकिंग क्रिकेटर’ म्हणून ओळखला जातो.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आता एकदिवसीय आणि T20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असून, आगामी ICC स्पर्धांमध्येही भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
फडणवीस यांनी या भेटीदरम्यान रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीचा गौरव करत म्हटले की, “रोहित शर्मा हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा गौरव आहे. त्याने देशासाठी अनेक संस्मरणीय क्षण दिले आहेत. त्याच्या कामगिरीने नव्या पिढीला प्रेरणा दिली आहे.