मुंबई: हौशा – नवश्यांना काय माहित शिवसेना – भाजप युतीचे महत्व असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांमुळेच युती तुटल्याचा आरोप केला आहे. ( What do the newbies know about the importance of the Shiv Sena-BJP alliance, Sanjay Raut alleges that the alliance was broken because of Amit Shah.)
शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपसंदर्भात नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर पुन्हा युतीची चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी तर शिवसेना-भाजप युती झाली म्हणजे तो सुवर्णक्षण असेल, असे म्हटले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विचार करणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत पाटील आहेत. परंतु भाजपमध्ये नवीन बाहेरुन आलेले हवशे-नवशे लोकांना शिवसेना-भाजप युतीचे महत्व माहीत नाही. नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले काम झाले. दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. युतीचे समर्थक आहेत. शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विचार करणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत पाटील आहेत. परंतु भाजपमध्ये नवीन बाहेरुन आलेले हवसे-नवसे लोकांना शिवसेना-भाजप युतीचे महत्व माहीत नाही. आम्ही एकत्र २५ वर्ष चांगले काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले काम झाले. दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. आम्ही मविआत भाजपमधील काही लोकांच्या हट्टामुळे गेलो. त्या लोकांमुळे २५ वर्षांची युती तुटली. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिला. आम्ही तेव्हा हिच मागणी केली होती. परंतु अमित शाह यांनी ही ती मागणी नाकारली. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती. आता पुन्हा अनेक लोकांना भाजप-शिवसेना युती होऊ शकते, असे वाटत होते. आता येत्या काळात काही घडमोडी घडणार आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेना उबाठामधील अनेक लोकांना युती व्हावी, असे वाटते.