विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालत आहेत? बीडची जनता मूर्ख वाटली का?” असा थेट सवाल करत फडणवीस यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा ते सारखे विजय पाहून डिप्रेशनमध्ये गेले आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut has criticized that Fadnavis has a hangover from victory or has gone into depression.)
2019 मध्ये बंद कराड कोणतीही चर्चा झाली नव्हती उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी केलेली मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांनी सपशेल फेटाळली होती. उलट आपण उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला. भाजपला कमी जागा मिळाल्याने आणि समीकरण जुळतंय दिसत असल्याने उद्धव ठाकरे यांनी रंग बदलले असा आरोपही त्यांनी केला होता. यावर राऊत म्हणाले आम्ही ज्योती तोडली असे ते सांगतात. मग २०१४ मध्ये काय झालं होतं? भाजपने तेव्हा युती का तोडली?” अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती. २०१९ ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणतं आहेत. मग २०१४ला काय झालं होतं? का भाजपने तेव्हा युती तोडली? शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणूका लढवल्या. आम्ही खूर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते?manoj jarange
फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाही. मग अटक का होत नाही? . “जरांगे पाटील यांचे मुद्दे बाजूला टाकण्यासाठी धस यांना पुढे आणले जात आहे का?”असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकत्र निवडणूक लढवली असती, तर निकाल वेगळा लागला असता. यातून शिकायला हवा असे सांगत दहा वर्षांत भाजप सत्तेत आल्यापासून संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे. विजयासाठी साम, दाम, दंड, भेद हे सर्व वापरण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकारणात संसदीय लोकशाहीत जय पराजय हार जीत होत असते मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाही .मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात आहेत, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी समाजसेवक आण्णा हजारे यांच्यावरही टीका केली. मोदींच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचारावेळी ते होते कुठे?अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचा आनंद आण्णा हजारे यांना झाल्याचा आरोपही त्यांनी केला. देश लुटला जातोय एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातयं याने लोकशाही टिकेल का?