पुणे : पित्याचा निर्घृण खून, संपूर्ण राज्यभरात आंदोलन, आणि तरीही जिद्द आणि अभ्यासावर विश्वास ठेवून वैभवी देशमुख हिने आपल्या बारावीच्या परीक्षेत ८५.३३% गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र) या शाखेत तिने ९१.५% गुण मिळवले आहेत.
( Sarpanch Santosh Deshmukhs daughter Vaibhavi Deshmukh achieved a remarkable success in 12th with 85.33% marks.)
विषयवार गुण:
भौतिकशास्त्र: ८३
गणित: ९४
जीवशास्त्र: ९८
इंग्रजी: ६३
मराठी: ८३
वैभवीच्या वडिलांचा संतोष देशमुख यांचा, ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांनी स्थानिक पवनऊर्जा प्रकल्पातील कथित खंडणीप्रकरणाचा विरोध केला होता, त्यामुळे त्यांना जीवे मारल्याचा आरोप आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांत वैभवीने बारावीची परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी तिने वडिलांच्या फोटोसमोर दिवा लावून त्यांना अभिवादन केले.
वैभवी भावुक होत म्हणाली, “बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतेय. त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. पण आज त्यांच्या अनुपस्थितीत या यशाचा आनंद अपूर्ण वाटतो.”
संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन झाले. आरोपींना सुरुवातीला अटक झाली नाही, मात्र वैभवीने आपल्या कुटुंबास, काका धनंजय देशमुख, धाकटा भाऊ आणि दुःखात सैरभैर झालेली आई यांच्यासोबत खंबीरपणे न्यायासाठी आंदोलन सुरूच ठेवले.
परीक्षेच्या काळातही वैभवी आपल्या लढ्यात ठाम होती. ग्रामस्थांनी वैभवीच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
[4:12 pm, 5/5/2025] Harshu: दोन्हीकडे टाकावी
[4:39 pm, 5/5/2025] Harshu: नागपूरकरांना अनुपम भेट, नागपूरमध्ये उभारला जाणार ‘जगातील सर्वात मोठा सिनेमा स्क्रीन’
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून नागपूरकरांना अनुपम भेट मिळत आहे. लवकरच नागपूर शहरात जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
( A unique gift to Nagpurians, ‘World’s largest cinema screen’ to be set up in Nagpur)
ही बाब केवळ भारतीय सिनेमा क्षेत्रासाठीच नाही, तर महाराष्ट्रासाठीही एक मोठा गौरव असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.ही स्क्रीन अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञानाने सज्ज असेल, अशी माहिती समोर आली आहे. याठिकाणी जागतिक फिल्म फेस्टिव्हल्स, मोठ्या चित्रपटांचे प्रीमियर आणि विशेष स्क्रीनिंग्स यांचे आयोजन होऊ शकणार आहे.
फडणवीस यांनी या उपक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “भारतीय मनोरंजनाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी टाकलेले पाऊल असे म्हटले आहे. या भव्य प्रकल्पाचे नेतृत्व हैदराबादस्थित निर्माता अभिषेक अग्रवाल करत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द व्हॅक्सीन वॉर’ यांसारख्या चर्चित चित्रपटांसाठी ओळखले जातात. याशिवाय, ‘बाहुबली’ आणि ‘साहो’सारख्या भव्य चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या यूव्ही क्रिएशन्स संस्थेचे विक्रम रेड्डी हेही या उपक्रमात सहभागी आहेत.
नागपूरसारख्या शहरात अशा स्तराचा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने, मनोरंजन आणि पायाभूत सुविधा यांच्या उत्तम एकत्रीकरणाचे उदाहरण निर्माण होत आहे.
वेव्हज शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आले.
या ऐतिहासिक प्रकल्पामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भक्कम पाठबळ आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमांना मूर्त स्वरूप मिळत आहे.
घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. प्रकल्पाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हा केवळ सिनेमा स्क्रीन नसेल, तर तो एक ‘सांस्कृतिक आणि डिजिटल मनोरंजन केंद्र’ असेल. येथे विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स, प्रीमियर शो, तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट सादरीकरणासाठी विशेष सुविधा असतील.
या प्रकल्पामुळे नागपूर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही देशाच्या केंद्रस्थानी येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची ओळख एक ‘सर्जनशील राज्य’ म्हणून अधोरेखित होणार आहे.
नागपूर मध्ये चित्रपट नगरी ज् उभारण्याची घोषणा यापूर्वी राज्य शासनाने केली आहे. रामटेक तालुक्यातील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असून येथे दळणवळणाच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. शहरात ऐकीकाळी २६ चित्रपट गृहे होती आता ती बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिली आहे. सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघणा-यांची संख्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेले थिएटर उभारले जात आहे.