राहुरीचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं.
त्यांचं वय ६६ वर्ष होतं. त्यांच्या या अकाली जाण्याने कुटुंब, कार्यकर्ते आणि संपूर्ण मतदारसंघ शोकसागरात बुडाला आहे.
शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक पदांवर कार्य केलं —
ते आमदार, राज्यमंत्री, तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते.
त्यांनी सदैव लोकाभिमुख कार्य, शेतकरीहित आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं.
त्यांच्या निधनामुळे अहमदनगर आणि राहुरी तालुक्यातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजकीय नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
“त्यांचं योगदान अमूल्य आहे. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत,”
असं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे.
भावपूर्व श्रद्धांजली