विशेष प्रतिनिधी
पिंपरी : चिंचवड रेल्वे स्टेशन चौकाजवळ धावत्या पीएमपीएमएल बसवर झाड कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही बस आकुर्डीच्या दिशेने जात होती. ( Seven passengers slightly injured after tree falls on PMP)
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग म्हणाले की, “छत्रपती शिवाजी चौकाजवळ झाड कोसळले आहे. वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर झाड काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.”
दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.