विशेष प्रतिनिधी
पुणे : विकृतीची परिसीमा गाठलेली घटना हडपसर परिसरातून उघडकीस आली आहे. एका विकृताने श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आयहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Sexual assault on dog by pervert incident revealed by CCTV)
हलीमुद्दीन शेख (रा. हांडेवाडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहण्यास आहे. संबंधित कुत्री पाळीव आहे. तिचा मालक कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता. त्यावेळी आरोपीने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केले. कुत्रीचा मालक घरी आल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये त्यांना अचानक बदल जाणवू लागले. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी घरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी हा घृणास्पद प्रकार प्रकार समोर आला. या प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे.
कुत्रीच्या मालकाने या घटनेची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह स्थानिक नागरिकांना दिली. पळसकर आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.