विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमतेच्या (AI) वापराबाबत निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असा आशावाद व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. ( Sharad Pawar congratulates Chief Minister Devendra Fadnavis for his courage in taking a decision regarding AI)
पवार म्हणाले, महाराष्ट्र सरकारने एआय धोरण जाहीर करून काल 500 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीच्या पिकांसाठी एआय वापरण्याचे धोरण फायनल केलं. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगलवरु झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेले “कृषी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता महा-अॅग्री एआय धोरण २०२५ ते २०२९” हे धोरण हे महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रात क्रांती घडवू शकणारे पाऊल आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अचूक माहिती, हवामानाचा अंदाज, पिकांचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर यासारख्या बाबींमध्ये सतत अडचणी येत असतात. या सर्व समस्यांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्तर शोधण्यासाठी हे धोरण राबवले जाणार आहे. राज्यातील लाखो शेतकरी दरवर्षी अनियमित पावसाळा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, पीक नुकसान, बाजारातील भावाची अनिश्चितता, अशा अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळाली, तर त्यांचे नुकसान मोठ्या