विशेष प्रतिनिधी
पुणे : गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा देण्यात आली होती. यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एका कार्यक्रमात जय कर्नाटक अशी घोषणा केली होतीअशी आठवण करून देत त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम नाही असे म्हणायचे का असा सवालही त्यांनी केला. (Sharad Pawar had also said Jai KarnatakaChief Minister said Maharashtra is not that narrow!)
पुण्यात जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपताना शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हटले आणि निघत असताना जय गुजरात असा नारा दिला. यावरून शिंदे यांच्यावर टीका सुरु झाली आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला आठवण करून देतो कि चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन करताना माननीय शरद पवार जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते, याचा अर्थ कर्नाटकवर त्यांचे जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर नाही असा आहे का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यांच्याविषयी आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर जय गुजरात असे म्हटले म्हणून एकनाथ शिंदे यांचे गुजरातवर प्रेम वाढले आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले असे नाही.
इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केले आहे. मोगली सत्ता घालविण्याचे आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकविण्याचे का मराठी माणसाने केले आहे. त्यामुळे एवढा संकुचित विचार कोणी करत असेल तर चुकीचा आहे.