विशेष प्रतिनिधी
सांगली : सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तीन तारांकित (थ्री स्टार) केली जाणार आहेत. राज्यभरातील १२५ वसतिगृहांसाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. (Social Justice Department hostels will be three-star says Social Justice Minister Sanjay Shirsat)
मिरज व सांगलीत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे यांच्यासह ‘बार्टी’चे महासंचालक सुरेश वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागीय उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मेघराज भाते आदी उपस्थित होते.
शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृहे उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने कार्यवाही केली. भविष्यात भाडेतत्त्वावरील सर्व वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्याचा प्रयत्न आहे. मागासवर्गीय मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया वसतिगृहात घातला जातो, त्यामुळे त्यांना थ्री स्टारप्रमाणे सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाने वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता ठेवावी.
आमदार खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्यासाठी प्रयत्न केला. तेथे अद्ययावत सोयीसुविधांसाठी प्रयत्न केले. मिरज तालुक्यात १७ बौद्ध विहार बांधले. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खासगी जागेत असून, ती शासकीय जागेत आणण्याचा प्रस्ताव सादर करू, त्याला मान्यता द्यावी