विशेष प्रतिनिधी
बीड : अमानुष मारहाण करणारा खोक्या या कार्यकर्त्यांमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आमदार सुरेश धस अंकी अडचणीत सापडले आहेत. आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे जमा करणारा आशिष विशाळ सहकारी असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ( Suresh Dhas admits to having a Aashish Vishal colleague who collected money in the name of Akrosh Morcha)
आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी मान्य केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप दिला होता. हा आशिष विशाळ माझा सहकारी आहे, अशी कबुली आमदार सुरेश धस यांनी अखेर दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची म्हणून आक्रोश मोर्चाच्या नावाखाली धाराशिवमधील आशिष विशाळ पैसे गोळा करत होता. काही दिवसांपूर्वी या आशिष विशाळ याला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याने धाराशिव शहरात खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी आमदार सुरेश धस यांनी माझा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत “याला आणखी तुडवा,” असे भाष्य केले होते. मात्र
आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी मान्य केले आहे. तो नेमका कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करत होता? तसेच त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफडी आणि 18 लाखांची कार आली कुठून? असा प्रश्न आता उपस्थित केला जातआहे.
एव्हढेच आशिष विसाळ हा आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगत सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत होता. त्यांच्याकडून खंडणी जमा करत होता. धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून तो पैसे गोळा करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.