विशेष प्रतिनिधी
बीड : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. यावर पुढारी करता करता दस यांची पुरेवाट झाली आहे.
धस यांनी आज बीडमध्ये दोन वेळा पत्रकार परिषद घेतली. पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे रुग्णालयात असल्याने आपण भेटायला गेलो होतो असे सांगितले होते. यावर मनोज जरांगे यांनी एवढी माया का आली, ती कोमात गेले होते का असा सवार करत सुरेश धस यांच्यावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुसऱ्या पत्रकार परिषदेत धस यांनी पुन्हा खुलासा केला.
ते म्हणाले,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलावलं होतं. मी तिथे गेलो होतो, अचानकपणे धनंजय मुंडे साहेब तिथे आले. आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली.प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, त्यांच्याकडून काही सांगण्यात चूक झाली असेल. परंतू त्यांनी आम्हाला हे मिटतंय का? अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं. मी क्लिअरकट त्यावेळीच सांगितलं होतं. त्यावेळी ते मनभेद नाहीत, मतभेद आहेत, असं म्हणाले आहेत. आमच्यामध्ये मतभेद आहेतच ना.. या प्रकरणाच्या बाबतीत मी माघार घेणार नाही. हे मी त्या बैठकीत क्लिअर सांगितलं. ही बाब पंधरा-वीस दिवसांपूर्वीची आहे.
मी जे दोन दिवसांपूर्वी त्यांना भेटायला गेलो ते माणुसकी म्हणून गेलो होतो. एखाद्या माणसाला रात्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हटल्यानंतर आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो. यांच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कोणतीही चर्चा नाही. तिथून परत आल्यानंतर रात्री भेटलो. त्यानंतर मी आणखी एक काम केलंय. 73 कोटींच्या बोगस घोटाळ्याचं पत्र मी अजित पवार यांच्याकडे पाठवलं आहे. काल मी स्वत: कृषी कार्यालयात गेलो होतो. तेथील घोटाळ्याची मी कागदपत्र घेतली होती. आज देखील मी धनंजय देशमुख यांच्याशी बोललो आहे. मी मुंडे यांची भेट घेतली असली तरी संतोष देशमुख प्रकरणात मी लढत राहिल. मनोजदादा आमचं दैवत आहे, गडबडीत काहीतरी बोलले असतील. मी त्यांच्याशी बोलेन.
आज ही संतोष देशमुख यांच्या पत्नीला नोकरीला लावतो म्हणून प्रलोभन दिल आहे, ते कळत आहे, पण अस जर कुणी प्रलोभन देत असेल तर ते योग्य नाही..मला कळलं आहे कुणी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयन्त करतोय…जर मुखमंत्री जर त्यांना शासकीय नोकरी दिली तर आम्ही विचार करू..मात्र कुणी आमिष दाखवून नाही, असंही धस यांनी स्पष्ट केलं.