पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शिताफीने पकडल्याची दावा पोलिसांनी केला आहे. मात्र पोलिसांनी नव्हे तर गुणाट येथील ग्रामस्थांनी गाडे याला पकडल्याचा दावा केला होता. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ग्रामस्थांचा दावा मान्य केला आहे. गुणाटमध्ये जाऊन ग्रामस्थांचा सत्कार करणार असून एक लाखाचे बक्षीसही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (The police commissioner accepted the claim of the villagers and will go to Gunat to felicitate them and give a reward of one lakh)
स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक केली. मात्र पोलिसांनी नव्हे तर आम्ही गाडे ला पकडले. पोलीस हिसकावून गाडे याला घेऊन गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासाठी स्थानिक नागरिकांचे आभार मानले असून ते त्यांच्या सत्कारासाठी गुणाट गावात जाणार आहेत. ते म्हणाले,
“एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत.
शेवटच्या माहितीवरून आम्ही आरोपीला पकडलं. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत, असेही अमितेश कुमार म्हणाले.
आरोपीला केल्या प्रकारचा पश्चात्ताप झाला होता. तो आत्महत्या करण्याच्या विचारात होता. त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बसला नाही. त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत आहेत. आरोपीला पकडायला आम्हाला उशीर झाला, पण आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात सादर केलं जाणार आहे, असावं अमितेश कुमार यांनी सांगितले.