पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील डेक्कन चौकात लागलेले एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
( Tai fulfill the wishes of Saheb Emotional poster campaign by Sharad Pawar group)
या पोस्टरमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला असून, त्यावर “ताई साहेबांची इच्छा पूर्ण करा” असा भावनिक मजकूर आहे.
या पोस्टरवर पुढे लिहिलं आहे, “साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोपवले आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन अजितदादा व आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात. संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येण्याची वाट पाहतोय.”