विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समुहाच्या सहकार्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. या विमानतळावर भारतीत लढावू विमानांची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. या विमानतळावरुन जून महिन्यापर्यत पहिले विमान आकाशात झेप घेण्याच्या दृष्टीकाेनातततून पहिले पाऊल पडले आहे. इंडीगो कंपनी आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात उड्डाणा संदर्भात नुकताच पहिला करार करण्यात आला आहे.
( The first aircraft will take off from Navi Mumbai International Airport by June)
नवी मुंबई विमानतळ लवकरच विमानाच्या उड्डाणसाठी सज्ज होणार असल्याची माहिती करारानंतर देण्यात आली आहे. इंडीगो नवी मुंबई विमानतळावरून १५ हून अधिक शहरांसाठी दररोज १८ उड्डाणे घेतली जाणार आहेत.पनवेल व उरणच्या परिसरात १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले आहे. अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल) ची उपकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) यांच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे बांधले गेले आहे. या कंपनीकडे ७४ टक्के हिस्सा आहे, तर सिडकोकडे २६ टक्के हिस्सा आहे.
इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले की, इंडिगोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाच्या धाव पट्टीवरुन पहिली विमानसेवा सुरु होणार आहे. याचा आम्हांला आनंद होत असून प्रवाशांच्या वाढत्या गरजा त्याबरोबरच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला इंडीगो आंतरराष्ट्रीय स्तरावर अधीक गतीमान करणार आहे.
इंडिगोसोबत अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (एएएचएल) भागीदारी करीत विमानसेवेसाठी करार करुन यशस्वी पाऊल टाकले आहे. नवी मुंबई विमानतळाला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे, अशी प्रतिक्रिया एएएचएलचे सीईओ अरुण बन्सल यांनी दिली आहे.