विशेष प्रतिनिधी
मुंबई: एका व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली संतोष देशमुख आणि परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही असा सवाल काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
तानाजी सावंत प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी पोलिसांना सवाल केले आहेत. बीडच्या घटनेवर पटोले म्हणाले, हे सरकार सत्तेचा दुरुपयोग सातत्याने करत आहे. हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिस मधून सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांना वरून आदेश दिले जातात. संतोष देशमुखचे प्रकरण परभणी प्रकरण असो. सत्ता पक्षाच्या आमदारांना माफ करा असं सांगत आहे. पोलिस प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करत आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा दिलेल्या स्थानावर बोलतानाया सरकारचे पोस्टमार्टम तीन मार्चपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात आम्ही करू
पटोले म्हणाले, या सरकारमध्ये डझनभरापेक्षा जास्त मंत्री आहेत जे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वक्तव्य करून राहुल सोलापूरकर महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांची जिभच कापली पाहिजे. सरकार झोपलेले आहे का? असा अपमान करणाऱ्यांना बक्षीस द्यायचे हे सरकारला अपेक्षित आहे का?
कृषी निविष्ठा कथित गैरव्यवहारावर पटोले म्हणाले, धनंजय मुंडे एकटे जबाबदार नसून तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जबाबदार आहे. हे सरकार मेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करत आहे. एकट्या धनंजय मुंडेला आरोपी करून चालणार नाही. हे शेतकऱ्यांचे पैसे खाणारे सरकार आहे. त्यामुळे येथे धनंजय मुंडे नाही तर सरकार दोषी आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संदर्भातला तिढा या आठवड्यात सुटेल, राहुल गांधी यांच्याशी तट यासंदर्भात बोलणं झालेला आहे. लवकरच नवीन अध्यक्ष मिळेल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस संघटनेतील बदल ही एक सिस्टीम आहे. एका पदातून मुक्त करून दुसऱ्या जबाबदारी द्यावी. कायमस्वरूपी संघटनेत कोणीच व्यक्ती राहत नाही. प्रत्येकाला संधी मिळावी. त्यापेक्षा चांगला काम करणाऱ्यास संधी मिळावी ही अपेक्षा असते. दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा संबंध नाही. संघटनेत बदल होत असतात.
पालकमंत्री पदावरील वादावरपालकमंत्री पद हे आता मुख्यमंत्री पदापेक्षा मोठ झालेला आहे असा टोला मारत पटोले म्हणाले, मंत्र्यांना जिल्ह्यातून कशी मलाई लुटता येईल त्यासाठी हे प्रकार सुरू आहे. हा भयानक आणि लाजिरवाणा प्रकार आहे. सरकारने बंद करावे ही अपेक्षा आहे.