विशेष प्रतिनिधी
पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अखेर दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. शांततेच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ( The step taken towards peace gives strength to the united fight against terrorismSharad Pawar supports the ceasefire)
शरद पवार यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं आहे की, शरद पवार यांनी यावर ट्विट करत म्हटले आहे की , भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ही भूमिका स्पष्ट असली तरी काँग्रेस पक्ष मात्र संभ्रमात असल्याचं चित्र आहे. १९७१ च्या युद्धाचा आणि बांगलादेशाच्या निर्मितीचा दाखला देत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.