विशेष प्रतिनिधी
मालवण : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. ( There is no threat to the newly erected statue of Shivaji at Rajkot Fortsays Shivendra Singh Raje Bhosale)
शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होत आहे. यावर भोसले म्हणाले, पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं सांगितलं मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळील जमीन खचल्याचा विषय माझ्या कानावर आल्यानंतर मी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या सर्व घटनेची माहिती घ्यायला सांगितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेत पुतळ्याला किंवा पुतळ्याच्या चबुतऱ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पुतळ्याच्या आजूबाजूला जो भराव केला होता त्या काही भागातील माती पाऊस जास्त असल्यामुळे खचली आहे. त्या ठिकाणच्या तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत.
आता पावसाळा सुरू झाला आहे आणि कोकणात पाऊस जास्त असतो. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या संपूर्ण परिसरावर नीट लक्ष ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना त्या ठिकाणी घडणार नाही याची खबरदारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेत आहोत. सर्व अधिकारी माझ्याशी बोलले आहेत पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्याच्या बाजूला असलेली जमीन पावसाळ्याच्या जास्त प्रमाणामुळे पाणी झिरपल्यामुळे थोड्या प्रमाणात खचली आहे. आणि त्याचे दुरुस्ती तात्काळ आता सुरु केली आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या आधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 कोसळला. त्यावरून मोठं राजकारणही झालं. त्यानंतर महायुतीच्या सरकारने पुन्हा गाजावाजा करत मूळच्या ठिकाणी नवीन पुतळा बसवला. हातातल्या तलवारीसह या पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे. राजकोटवरील नव्या पुतळ्याचे अनावरण मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. १५ जून २०२५ रोजी “रत्नागिरी टाइम्स” या वृत्तपत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याबा झालेल्या बातमीसंदर्भात खालील खुलासा करण्यात येत आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज त्याचा चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सदर चबुतऱ्याला कोणतीह नुकसान झालेले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. तथापि, दि. १४ व १५ जू सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भराव (Backfilling) किंचित प्रमाणात खचला आहे. याचा चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
सदर खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु असून, हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत आहे