विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / श्रीनगर : काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामच्या बैसरण खोऱ्यात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २५ जण ठार झाले असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. ( They shot him because he was not a Muslimhe thrilling story of a woman who survived the Pahalgam terror attack 25 feared dead)
या हल्ल्यातून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, “आम्ही भेळ खात होतो… आणि अचानक एका बंदुकधाऱ्याने माझ्या नवऱ्यावर गोळी झाडली. त्याने विचारले, ‘तू मुस्लिम आहेस का?’ आणि जेव्हा माझ्या नवऱ्याने नकारार्थी उत्तर दिलं, तेव्हा त्याच क्षणी गोळी झाडली.”
काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामच्या बैसरण खोऱ्यात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. हा गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण नागरी हल्ला आहे.
बैसरण हे हिवाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटकांना घोड्यावरून प्रवास करून तेथे पोहोचावे लागते. दुपारी २.४५ वाजता एका महिला पर्यटकाने पोलीस कंट्रोल रूमवर फोन करून गोळीबाराच्या आवाजाची माहिती दिली. त्यानंतर पोलीस, सीआरएफ व लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, गोळीबार करणारे दहशतवादी लगेच जंगलात पळून गेले. त्यांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनास्थळी पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी च्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात ताफा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळाकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत आहे. सध्या पर्यटकांना बैसरणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी कैसर अली यांनी दिली.
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या TRF (The Resistance Front) या गटाने घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून त्याला “अमानुष कृत्य” असे संबोधले. त्यांनी लिहिले की, “हे हल्लेखोर जनावरे आहेत. अशा घटनेमुळे मला धक्का बसला आहे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करताना स्पष्ट शब्दांत लिहिले की, “या अमानुष कृत्यामागे असणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांना माफ केले जाणार नाही.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजच श्रीनगरला रवाना होणार असून, तेथे सर्व सुरक्षा यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत पुढील कारवाईचा आराखडा ठरवला जाईल, अशी माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण असून, लष्कर आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरले आहे.