विशेष प्रतिनिधी
पुणे : व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकी मिळाली आहे. मात्र, त्यांनी काळजी करू नये. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारणारा हा भारत आहे. कोणत्याही पोकळ धमक्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिला. (Threat from Pakistan Chief Minister Devendra Fadnavis said that the country that invades and kills)
पुण्यात पत्रकारांशी बोलताना तुर्की विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी ‘राष्ट्रप्रथम’ ही भूमिका स्वीकारली असून त्या व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, पहलगाम मधील हल्ला हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता तर तो मानवतेवर झालेला हल्ला होता. मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणार नाही ही आमच्या व्यापाऱ्यांची भूमिका अभिनंदनास पात्र आहे.
फडणवीस म्हणाले, राष्ट्र प्रथम ही भूमिका पुण्याच्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली. त्या व्यापाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकी मिळाली आहे. मात्र, त्यांनी काळजी करू नये. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारणारा हा भारत आहे. कोणत्याही पोकळ धमक्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. राष्ट्र प्रथम या भूमिकेवर सर्वांनी कायम राहावे. ही नैसर्गिक भावना तयार होत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहे.
मराठा आरक्षण संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत आमची देखील तयारी आहे. उच्च न्यायालयाने खंडपीठ तयार केल्यानंतर सरकारची बाजू भक्कमपणे मांडणार असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, वास्तविक मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हाता वेगळ्या करा, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाला दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिलेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला महायुती म्हणूनच लढायच्या असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. आमची महायुती भक्कम आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे अपवादात्मक काही ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढल्या जाऊ शकतात. मात्र असे एखादे ठिकाणी सोडले तर आम्ही सर्वच ठिकाणी एकत्र लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र, ज्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, त्या ठिकाणी एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ज्या ज्या ठिकाणी महायुती असेल, त्या त्या ठिकाणी महायुतीच करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काही ठिकाणी कार्यकर्त्यांना दोष देता येत नाही. त्यांचा बाजू स्वाभाविक आहे. पाच- पाच वर्षांपासून कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आताच संधी असते. ती त्यांना मिळायलाच हवी, असे त्यांना वाटत असते. त्यामुळेच आम्ही तिघांनी देखील असाच निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, एखाद्या ठिकाणी वेगळे लढलो तरी देखील निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येणार आहोत. निवडणुकीनंतर अशा ठिकाणी पुन्हा महायुती स्थापन करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लॉरेन्स बिश्नोई यांचे पोस्टर काही ठिकाणी झळकले असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी देखील मला दिली आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला सांगा, असे मी त्यांना सांगितले आहे. लॉरेस बिष्णोई सारखे क्रिमिनल आरोपी आहेत. त्यांचे महिमा मंडन करणे हे सहन केले जाणार नाही. ज्यांनी लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर झळकवले त्यांच्यावर देखील कारवाई होईलच, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये फार अडचणी येतील, असे मला वाटत नाही. वेळची या निवडणुका घेण्याचा आमचा आणि निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. एखाद्या भागात खूप जास्त मान्सून असेल, तर एखाद्या विभागासाठी मुदत मागून घेतली जाईल. मात्र या निवडणुका वेळेतच होतील, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.