विशेष प्रतिनिधी
पुणे : औंध येथील ब्रेमेन चौकाजवळ दुर्घटनेत दोन तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. एमएसईबीच्या डीपीच्या संपर्कात आल्याने दोघा तरुणांना जोरदार शॉक बसल्याचे समोर आले आहे. ( Two die of electric shock in Aundh incident near public toilet)
विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९, रिक्षाचालक, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे (वय २७, नोकरदार, रा. कोथरूड) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
१३ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत विनोद घरी न परतल्याने त्यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ब्रेमेन चौकाजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ एमएसईबीच्या डीपीजवळ हे दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळले. स्थानिकांनी माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एमएसईबी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीजपुरवठा खंडित करून मृतदेह बाहेर काढले.