विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध चालू आहे. त्यामध्ये रामदास कदम आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरेंवर अत्यंत विखारी टीका करताना त्यांची जीभ घसरली. सोनिया गांधी यांचे पाय चाटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ( Uddhav Thackeray is doing the work of licking Sonia Gandhi’s feet,
Ramdas Kadam’s tongue slipped while criticizing)
शिवसेनेच्या ठाकरे गटातून अनेक जण शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यावर बोलताना
पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तेवढी तुमची शिवसेना शिल्लक आहे, अशी विखारी टीका कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
कदम म्हणाले, आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपली, बाळासाहेबांचे विचार जपले. भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम आम्ही केले आहे. दिवा विझताना आधी फडफडतो तशीच फडफड सध्या संजय राऊत यांची चालू आहे.
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घेतलेल्या टीकेचा समाचार घेताना कदम म्हणाले, आकाशाकडे बघून थुंकलो की ती थुंकी पुन्हा आपल्याच तोंडावर उडते याचे त्यांना भान आहे का? यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीच नाही तर दिवसाही स्वप्नात दिसतात. कारण त्यांनी तुमचा नायनाट केला, भ्रष्टाचार थांबवला. त्यामुळे लढाईच्या वेळी मोघलांना पाण्यामध्ये जसे संताजी -धनाजी दिसायचे तसे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत यांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतात. तुम्हाला महाराष्ट्र वैतागला आहे, तुम्हाला चॅनलवर पाहिलं की लोकं चॅनल बदलतात. पाला मेल्यानंतर शेपटी वळवळते आता तेवढीच तुमची शिवसेना शिल्लक आहे.