[3:47 pm, 22/4/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेली जवळीक आणि संभाव्य राजकीय समीकरणांमुळे मुंबईत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांना मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा अशी उपाधी दिली आहे. ( Uddhav Thackeray is the kingpin of Mumbais land scam Ashish Shelar slams him)
भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेलार यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मुंबई महापालिकेवर तब्बल २५ वर्षे सत्ता होती. या काळात मुंबईतील मौल्यवान जमिनींचा बेकायदेशीर वापर झाला. आज मुंबईत एका चौरस फूट जागेची किंमत लाखोंमध्ये आहे, पण ठाकरे यांच्या कारकिर्दीत १ कोटी चौरस फूट जमीन फुकटात बिल्डरांना दिली गेली. त्यामुळे, उद्धव ठाकरेंना आता कोणालाही जाब विचारण्याचा नैतिक अधिकार नाही.
शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरे सतत केवळ लँड आणि लँड स्कॅम याचाच विचार करत असतात. ते आता काहीही नवे बोलत नाहीत, केवळ हे सरकार ही जमीन अम्बानीला देतं, ती अदानीला देतं, अशी बिनबुडाची टीका करत राहतात.”
शेलार यांनी ठाकरे यांच्यावर वक्फ कायद्याबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचाही आरोप केला. “उद्धव ठाकरे म्हणतात की, वक्फ कायद्यामुळे तुमची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी सरकार काढून घेईल. पण हे साफ खोटं आहे. या देशात कायदा आहे आणि न्यायव्यवस्था आहे. नरेंद्र मोदी सरकार गरीब मुस्लिमांसाठी काम करत आहे, वक्फ बोर्डाने बेकायदेशीर घेतलेल्या जमिनी पुन्हा मूळ हक्कदारांना परत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत,” असे शेलार यांनी स्पष्ट केले.
शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, “जे मुस्लिम समाजाला केवळ मतबँक म्हणून पाहतात, तेच लोक आज वक्फ कायद्याच्या विरोधात नाटकं करत आहेत. आम्ही अशा सर्वांची यादी प्रसिद्ध करू आणि त्यांना उघडे पाडू.”
वक्फ कायद्याचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, “आज परिस्थिती विरोधात वाटत असली तरी भविष्यात काळ सिद्ध करेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय योग्य होता. वक्फ कायदा हे गरीब मुस्लिम समाजासाठी क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.”
[3:48 pm, 22/4/2025] Harshu: दोन्हीकडे टाकावी