सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण ( Pune’s largest flyover built on Sinhagad Road finally opened for traffic, inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis )
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करून या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
हा उड्डाणपूल ११८ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीतून तीन टप्प्यांत उभारण्यात आला. वाहतुकीसाठी हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा मौल्यवान वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. याआधी सिंहगड रोडवरून प्रवास करताना साधारणपणे ३० मिनिटांचा कालावधी लागत होता, तो आता केवळ ६ मिनिटांवर आला आहे.
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. #पुणे #सिंहगडरस्ता #उड्डाणपूल #मुख्यमंत्री #वाहतुकीसाठीखुला #पुणेकर #महाराष्ट्र #Pune #SinhgadRoad #Flyover #CM #TrafficeRelief #Maharashtra pic.twitter.com/KTyiramMvk
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) September 1, 2025
- पहिला टप्पा : राजाराम ब्रिज चौकाजवळील 520 मीटर (₹15 कोटी)
- दुसरा टप्पा : विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर 2.1 किमी (₹61 कोटी)
- तिसरा टप्पा : गोयलगंगा चौक ते इनमदार चौक 1.54 किमी (₹42 कोटी)
काम सप्टेंबर 2021 मध्ये सुरू झाले होते आणि नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण झाले. या फ्लायओव्हरमुळे फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी प्रवासात 15 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे.
या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे.