विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव सातत्याने घेतले जात होते. मात्र पुरुषांनी त्याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल केला नव्हता. आता सीआयडीने केलेला आरोप पत्रात वाल्मीक कराडकर मास्टरमाइंड असल्याचे म्हटले आहे.खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. (Valmik Karadach mastermind in Santosh Deshmukh murder case)
राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. आता सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते सीआयडीच्या हाती लागले . देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचले. हत्येमागच हेच कारण आहे.