विशेष प्रतिनिधी
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी पडझड सुरू आहे. यामुळे लाखो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. नाशिक मधील तरुणाने शेअर बाजारात मोठी नुकसान झाल्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या केली. ( Victim of fall in stock market, youth commits suicide by pouring petrol due to loss)
रवींद्र कोल्हे (वय 28 ) असे या तरुणाचे नाव आहे.
मूळचा चांदवड तालुक्यातील असलेला रवींद्र नाशिक येथे एका खासगी बँकेत काम करत होता. पगाराची रक्कम तो शेअर बाजारात गुंतवत होता. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत असल्याने त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे सुमारे 16 लाख रुपये शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गेले. त्याच्यावर कर्जही झाले होते . यामुळे तो प्रचंड नैराश्यात गेला होता. आईवडिलांची फसवणूक केल्याची त्याची भावना झाली होती.
महाशिवरात्रीच्या दिवशी ते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेला. दर्शन करून परत जाताना, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका शाळेच्या मोकळ्या परिसरात आपली मोटरसायकल थांबवली. मोटार सायकलवर बसलेला असतानाच आपल्या सोबत आणलेली एक पेट्रोलची बाटली अंगावर ओतून घेतली आणि स्वतःला पेटवून घेतले. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांना कळवले. पोलीस अग्निशामन दलाच्या जवानांसहित घटनास्थळी दाखल झाले. पण नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाला.