विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: कोण संजय राऊत? अशी विचारणा करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर व्यक्त केला आहे. ( Who is Sanjay Raut Shrikant Shindes anger over allegations regarding Amit Salunkhe)
झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात बिहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक अमित प्रभाकर सांळुखेला अटक केली. पुण्यातील सुदर्शननगर येथील अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे फौंडेशनशी संबंध असल्याचे म्हटले आहे. त्याने घोटाळ्यातील सर्व पैसा श्रीकांत शिंदे फौंडेशनला वळवला असून 800 कोटींचा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. अमित हा शिंदे पिता पुत्राचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचा आरोपही आरोप केले आहेत.
यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोण संजय राऊत? मी कोणत्या संजय राऊतला ओळखत नाही. जो रोज उठून कुठलाही पुरावा न देता आरोप करतो, शिव्या शाप दिल्या जातात. याची तुम्ही देखील बाजू तपासली पाहिजे. संजय राऊत यांच्या आरोपावर उत्तर द्यायला मी बांधील नाही. पुरावे असतील तर समोर बसून दाखवले पाहिजेत. कुणी कुणावर आरोप करत असेल, तर ते पुराव्यानिशी केले पाहिजेत. कोण प्रश्न विचारत आहे त्याला मी ओळखत नाही.
तपासादरम्यान झारखंडमध्ये अमितच्या घोटाळ्यात सहभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे एसीबीला सापडले आहेत. एजन्सीच्या मते, घोटाळ्यातील नामांकित आणि अनामिक आरोपींशी त्याचे आर्थिक संगनमत होते. दारूशी संबंधित बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारात आणि वितरणात अमितची भूमिका आढळून आली आहे. तपासात सहकार्य न केल्याबद्दल एसीबीने अमितला 15 जुलै रोजी पुन्हा नोटीस पाठवली आणि 23 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यानंतर चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत. महायुतीला ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं तसंच यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील मिळेल