विशेष प्रतिनिधी
मुंबई: निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा प्रस्ताव घेऊन कोणी तुमच्याकडे आले. तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? असा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
( Why didnt you complain to the Election Commission then Did you want to try to do something wrong Chief Minister questions Pawar Raut)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याकडे दोन माणसे आली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 160 जागा जिंकून देतो असा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट केला होता. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंकडेही असाच प्रस्ताव घेऊन काही लोक आले होते, असे म्हटले होते.
यावर पलटवार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हणाले की, “ही सलीम जावेदची गोष्ट सुरु आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? त्यामुळे मला वाटतं या सलीम-जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत,”
आता हे गंभीर होत चालले आहे की, हे सगळे मिळून अशा प्रकारचे षडयंत्र तयार करत आहे. माझी अपेक्षा होती की, हे देशातील मोठे नेते आहेत. कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पोलिसांना कळवायला हवे. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत.” असे म्हणत त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे 4 वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना ओपन चॅलेंज दिले. पण, अजूनपर्यंत कोणीही ईव्हीएम हॅक करू शकले नाही. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीवर इकडे-तिकडे बोलत आहेत. पण, निवडणूक आयोगाला समोर जायला तयार नाही. निवडणूक आयोग त्यांना पत्र देत आहे, नोटीस देत आहे, जाहीर निमंत्रण देत आहे. तिथे हे बोलत नाहीत. कारण मी यापूर्वी सांगितले की, शूट ऍंड स्कूट गोळा डागा आणि पळून जा ही रणनीती यांची आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य करताना, शरद पवार ते इतक्या दिवसांनी का बोलत आहेत? असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधींना भेटल्यावरच याबाबतची त्यांना आठवण का आली? इतक्या दिवसानंतर ते आजच अचानक का बोलले? राहुल गांधी ज्या प्रकारे सलीम-जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोकल्पित कहाण्या सांगतात तशी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना?