विशेष प्रतिनिधी
सांगली : आरक्षण मागून मराठे सुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. (Why narrow yourself down by asking for reservation? Run the country, Sambhaji Bhide Guruji appealed to the Marathas)
पत्रकारांशी बोलताना भिडे गुरुजी म्हणाले, महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना, राष्ट्र गाडा न चाले।।” मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण हवे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाहीये, हे दुर्दैव आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत? हे जर समजले, तर देशाचे कोट कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नाहीत.
सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिजा मातेचं जीवन चरित्र, शहाजी राज्यांचं जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत, कुठल्याही भाषेतले लोक असोत, सक्तीचा करायला हवा, अशी मागणी भिडे गुरुजी यांनी केली.
देश टिकवायचा असेल तर संस्कृत शिकवायल हवी . या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. पण हे करण्यची इच्छा उत्पन्न होईल, असे महाराष्ट्राचे शासनही असायला हवे. शिवाजी-संभाजी-शहाजी आणि जीजामाता या व्यक्तीमत्वांमुळेच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय, असेही ते म्हणाले.