विशेष प्रतिनिधी
पुणे : पहिलीपासून हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सुनावले आहे.आपण इंग्रजीचे गोडवे गातो आणि इंग्रजीला जवळ करतो. त्याचवेळी आपल्या राष्ट्रीय भाषेला म्हणजेच हिंदीला दूर का करतो असा प्रश्नही त्यांनी केला. ( Why should English language be considered close and Hindi the national languagedistant The Chief Minister clarified that Marathi language is compulsory in Maharashtra)
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता तीन भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यात आपल्याकडे हिंदी भाषा शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळेच आपण हिंदी भाषा स्विकारली. मात्र मराठीच्या ऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान
भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पुण्यात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, ज्या तीन भाषा अनिवार्य केल्या गेल्या आहेत, त्यात दोन भाषा या भारतीय असव्यत असा नियम आहे. दोन भाषांमध्ये मराठी भाषा आहेच. आणि दुसरी भाषा घ्यायची झाली तर हिंदी, कन्नड, तामिळ अशा आदी इतर भाषा निवडाव्य लागतील. अशावेळी हिंदीची निवड केली गेली. कारण त्याचे शिक्षक आपल्याकडे पहिल्यापासून आहेत. तरीही २० पेक्षा अधिक विध्यार्थ्यांनि एखाद्या शाळेत अन्य प्रांतिक भाषा निवडली तर त्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याच्या सीमा भागात हे शक्य आहे.
राज्यात एप्रिल मे महिन्यात दरवर्षी काही भागात पाणी टंचाई जाणवते. विशेषतः जेथे पाण्याचे स्वतंत्र स्रोत नाहीत तेथे ही समस्या भेडसावते. या करिता राज्य सरकारने त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी यांना तेथील टंचाई संदर्भात मॅपिंग करून तेथे वेगवेगळ्या स्रोतातून पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावयाची आहे. यासाठी राज्यात सर्व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले गेले आहे असगी माहिती फडणवीस यांनी दिली.
भाजप मधील मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या आता झाल्या आहेत. लवकरच जिल्हा अध्यक्षाच्या नियुक्या होतील. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक होईल. आमच्या पक्षात लोकशाही मार्गाने निवड होते. असेही फडणवीस म्हणाले.