विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपण आहोत याचा अजित पवार यांना गर्व आणि अहंकार आहे. कुंडमळा पूल दुर्घटनेची जबाबदारी आपण घेणार आहात का झटकून टाकणार आहात? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
( Will he take responsibility for the Kundamala tragedy as the guardian minister Sanjay Raut questions Ajit Pawar)
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्र मध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे .केंद्रातला आणि राज्यातील या सरकारल पणवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात, दहशवादी हल्ले सुरू आहेत.ऑप्रेशन सिंदूर झालं , पहलगाम झालं, अहमदाबादला विमान हल्ला झाला .काल दोन दुर्घटना घडलेल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नरेंद्र मोदींनी बसविला. तो भ्रष्टाचार झाल्यानंतर कोसळला. तो मोठा गाजावाजा करून सरकारमधील काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसविला होता आता त्याचे चित्र समोर आहे. एक महिन्यापूर्वी पुतळ्याचे उद्घाटन केलं संपूर्ण समुद्र ज्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला.
राऊत म्हणाले, गेटवे ऑफ इंडिया इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा समुद्रातच आहे त्या गेल्या ६० वर्ष पासून उभा आहे. शिवतीर्थावरचा पुतळा जवळ देखील समुद्रात आहे.पुन्हा एकदा मालवण येथील पुतळा बसविताना भ्रष्टाचार झाला का? तेथील पैसे अन्य ठिकाणी वळविले का असा प्रश्न उपस्थित होतोय
मावळ मधला कुंडमळा भाग आहे तेथील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला. नक्की किती लोक पुरात वाहून गेले याचा खरा आकडा समोर आलेला नाही. त्या पूलावर 100 पेक्षा जास्त पर्यटक उपस्थित होते. किमान 50 लोक वाहून गेले. काही लोक सापडले असतील असे सांगून राऊत म्हणाले, विकासाच्या गोष्टी करतात आमच्या शिवाय कोणी विकास करू शकत नाही. माझा अजित पवारांना प्रश्न आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. पवारांना हा पूल जुना झाला आहे माहीत नव्हते का ? त्या ठिकाणी सुनील शेळके नावाचा आपला आमदार आहे त्याला घेऊन ते फिरत असतात. त्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झाले. पण एक दोन कोटीचा पुल गेल्या अनेक वर्षांमध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. एरवी अजित पवार मोठ्या तावातावाने बोलत असतात. पण कालपासून त्यांच बोलणं मी ऐकले नाही.पालकमंत्री अशा लहान कामांमध्ये गुंतलेले असतात. बिल्डरांची कामं, मेट्रोचे काम, मोठ्या ठेकेदारांची काम यातपालकमंत्री गुंतलेले असतात. बाकी वेळी झोपलेले असतात काल जे बळी गेला त्याला जबाबदार कोण ? हे अजित पवारांनी सांगितलं पाहिजे. या बाबतीत सरकार किती गंभीर आहे? कागदावरती हे पैसे मंजूर झाले आहेत . मग पूल का नाही झाला पैसे गेले कुठे ? बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळतात, आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे मिळतात, निवडणुकीमध्ये मिळतात, लाडक्या बहिणीचे मते विकत घ्यायला पैसे मिळतात, पण काल 40 एक लोकांचे बळी गेले . तो पूल दुरुस्त करायला पैसे का नाही दिले? असा सवाल राऊत यांनी केला.
११ जुलै २०२४ साली बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे काम कुंडमळा रस्ता, इंद्रायणी नदीवर पुलाचे बांधकाम करणे या कामाला सुरुवात करणे, अशा कामाला मंजूरी दिलेली आहे. हे रवींद्र चव्हाण यांचे रवींद्र भेंगडे, अध्यक्ष भाजप, मावळ तालुका यांना दिलेले सहीचे पत्र आहे .मंत्री सह्या करताना किती नॉन सिरीयस असतात. ८ कोटीच काम आहे असं मी ऐकलं पण, पत्रावर आहे ८० हजार. पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी सही केली.काल अनेक लोक मेली, ही जबाबदारी नाही का पालक मंत्र्यांची अजित पवार कुठे फिरतायत तु्म्ही ? कुठे आहे तुमचे आमदार सुनिल शेळके जे शरद पवार यांच्या तिकीटावर निवडून आले? रस्ता करण्यासाठी तो पूल बांधण्यासाठी किमान दहा ते पंधरा कोटीची गरज असते. पण पत्र खुश करण्यासाठी टाईप केलं आणि काम मंजूर केलं 80 हजारात. ते देखील वापरण्यात आलेले नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत राऊत म्हणाले , या निवडणुका अनेकदा स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असतात
शरद पवारांचे म्हणणे बरोबर आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागते. त्यांच्या काय भूमिका आहेत ते पहावे लागतात. शिवसेनेने देखील तिच भूमिका घेतलेली आहे. पालिका स्तरावर प्रत्येक ठिकाणी भूमिका वेगळी असते. आमचा शत्रू भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत असलेल्या या टपोरी टोळ्या आहेत.