विशेष प्रतिनिधी
पुणे : तळवडे आयटी पार्क परिसरात मोकळ्या जागेत एका ३० वर्षीय महिला आणि ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांचाही खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ( Woman and man found murdered in Talwade IT Park area)
मंगला सुरज टेंभरे (वय ३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५, रा. अकोला) अशी मृतांची आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार दत्तात्रय साबळे या संशयितांला ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळाच्या आसपास तपासणी करत असताना परिसरात रक्ताचे डाग, झाडीत मृतदेह टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून विविध नमुने जमा करून फॉरेन्सिक तपास करत आहेत. खुणामागची कौटुंबिक किंवा आर्थिक कारणे तपासली जात आहेत.