विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळ एका बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. दुचाकी चालक जखमी झाला. हा अपघात शनिवारी (७ जून) सकाळी घडला. ( Woman dies after bus hits two-wheeler on Pune-Mumbai highway)
निंगाम्मा बंडाप्पा बिराजदार (३६, दापोडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल पवार आणि महिला निंगाम्मा हे दोघे दापोडी येथून तळेगाव दाभाडे येथे दुचाकीवरून जात होते. तळेगाव दाभाडे परिसरात इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर एका बसने पवार यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात निंगाम्मा या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर पवार हे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेला आहे