विशेष प्रतिनिधी
पुणे : महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर-पुणे मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाच्या वतीने पुणे मेट्रोमध्ये उत्साहात कार्यक्रम पार पडला. ( Women’s Day celebrated with enthusiasm in Pune Metro)
या कार्यक्रमाला महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी निलोदपाल , स्टेशन मॅनेजर प्रथमेश बढे , राजदीप एंटरप्रायझेसचे प्रोजेक्ट मॅनेजर मनोहर रसाळ आणि टीम लिडर संजय मगर ,ओमकार कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात युनियन पदाधिकारी राम सुरवसे, यश निंबाळकर, राज शेलार, अजय खोसे, अन्सारी मॅडम, विलीयम सर, भावेश सर,मंगल खिलारे,कैलास मोरे, कैलास चौगुले, यालाप्पा,यांनीही सहभाग घेतला. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत व सहकार्य संस्कृती जपण्याचा निर्धार करत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
तसेच नागपूर / पुणे मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष महेश खांदारे व महामंत्री नितीन कुकडे उपाध्यक्ष रोहित नारनवरे यांनी पुणे मधील संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.