विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद :भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक सुरू केल्यापासून पाकिस्तानातील असंतुष्ट गटांमधील खदखद उफाळून आली आहे. विशेषतः बलुचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने भारताला थेट सहकार्याची ऑफर दिली असून, “भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही पश्चिमेकडून तो देश नष्ट करू,” असा थेट इशारा बीएलएने दिला आहे. ( You just attack we will destroy Pakistan from the west Baloch Liberation Army demands cooperation from India)
बीएलएने जारी केलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, “पाकिस्तानचा युद्धविराम व शांततेचा संदेश हा केवळ एक कुटील डाव आहे. आयएसआयसारख्या गुप्तचर यंत्रणेचा आधार घेत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा केंद्रबिंदू बनला आहे. भारताने अशा बनावावर विश्वास न ठेवता निर्णायक लष्करी पाऊल उचलावे. बलूच जनता पूर्ण ताकदीने भारताच्या पाठीशी उभी राहील.”
बीएलएने पत्रात म्हटले आहे की”आम्ही कोणत्याही बाह्य मदतीशिवाय बलुचिस्तानमध्ये पाक लष्कराला अनेकदा धडा शिकवला आहे. पण आता वेळ आली आहे की भारत, आंतरराष्ट्रीय समुदाय, आणि प्रादेशिक शक्तींनी पाकिस्तानच्या मुळावर घाव घालावा. जर पाकिस्तान अस्तित्वात राहिला, तर दहशतवाद, अस्थिरता आणि हिंसाचार कधीही संपणार नाही.”
बलूच लिबरेशन आर्मीने पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तानच्या ‘शांतता’ आणि ‘विराम’ वक्तव्यावर विश्वास ठेवू नका ti फसवणूक आहे.
भारताने राजकीय, राजनैतिक आणि लष्करी सहकार्य द्यावे.
आम्ही पश्चिम आघाडीवरून पाकिस्तानवर आक्रमण करण्यास तयार आहोत. बलोचिस्तानच्या भूमीवर आम्ही अणुबॉम्बधारी राष्ट्राला पराभूत केलं आहे.’स्वतंत्र बलूचिस्तान’ हाच या भागातील शांततेचा एकमेव मार्ग आहे.
बीएलएने असा दावा केला आहे की, जर भारताने निर्णायक भूमिका घेतली, तर पाकिस्तान दोन आघाड्यांवर भारत आणि बलूच लष्कर यांच्यासमोर टिकू शकणार नाही. “आता वेळ आली आहे की पाकिस्तान या नकाशावरून नाहीसा झाला पाहिजे,” असे तीव्र विधान करत बीएलएने भारताला एक ऐतिहासिक संधी असल्याचे बजावले आहे.
पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय एकांगी स्थितीत ही भूमिका भारतासाठी एक प्रभावी डाव ठरू शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
“हा फक्त लढा नव्हे, तर दहशतवाद मुक्त उपखंड घडवण्याची सुरुवात आहे,” असे बोलले जात आहे.