विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे महापालिकेच्या व्यायाम शाळेत स्वतःचे राजकीय कार्यालय स्थापन करून गेल्या १२ वर्षांपासून बिनधास्तपणे वीज चोरी केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, महावितरणच्या अधिकृत अहवालातही कलम १३५ नुसार वीजचोरी सिद्ध झाली आहे. इतके असूनही अद्याप गुन्हा दाखल न होणे म्हणजेच भाजपसाठी महावितरणची तळमळ व गुलामगिरीचे दर्शन आहे.
याच अन्यायकारक व भेदभावी वागणुकीचा निषेध करण्यासाठी पुणे महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयावर युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले.
गंभीर बाब म्हणजे, सामान्य ग्राहक वीजबिल भरू शकत नसल्यास त्याचा तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जातो, पण भाजपचा माणूस असल्याने घाटे यांच्यावर कारवाई होत नाही. असा दुहेरी न्याय सहन केला जाणार नाही. शहर युवक काँग्रेसने याविरोधात महावितरण कार्यालयात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर नोटीस देऊन सोडले.
मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे १२ वर्ष वीजचोरी करूनही अजून कारवाई नाही हेच भाजपच्या भ्रष्टाचाराचं आणि महावितरणच्या गुलामीचं जिवंत उदाहरण आहे. एकीकडे सामान्य माणसाचं कनेक्शन तोडतात, दुसरीकडे भाजप नेत्याला पाठीशी घालतात. युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल पण असा पक्षपाती आणि गुन्हेगारांना वाचवणारा प्रशासन खपवून घेणार नाही!”
शहरध्यक्ष सौरभ अमराळे, म्हणाले
धीरज घाटे हे केवळ भाजपा शहराध्यक्ष नाहीत, तर भाजपा भ्रष्टाचाराचं प्रतीक आहेत. १२ वर्ष वीजचोरी करून चार लाखांचं नुकसान करूनसुद्धा मोकळेपणाने फिरत आहेत, कारण भाजपसाठी कायदे वेगळे असतात! वीज चोरांवर गुन्हा दाखल न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडेल.”
मीडिया विभागाचे प्रदेश अध्यक्ष अक्षय जैन,
शहर अध्यक्ष सौरभ अमराळे, जिल्हाध्यक्ष उमेश पवार, सागर धाडवे, किशोर मारणे, महासचिव प्रथमेश आबनावे, सचिव आनंदकुमार दुबे, मेघश्याम धर्मावत, राज जाधव, हर्षद हांडे, अक्षय बहिरट, सद्दाम शेख, साकिब सय्यद, ऋषीकेश वीरकर, अभिजीत चव्हाण, तुषार पठारे, मतीम शेख, अनिरूद्ध जगदाळे, संकल्प कोंडेकर, रमेश सातपुते, निहाल शेख, प्रथम परिट, अजय बनसोडे, यश कोलते आदी उपस्थित होते.