विशेष प्रतिनिधी
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका करत आहेत. आता अंजली दमानियांनी ट्वीटवर पोस्ट करत हाके यांच्यावर पलटवार केला आहे. हाके आणि हवेत गोळीबार करणारा धनंजय मुंडे समर्थक कैलाश फड यांच्या बरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.
अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आणि एक फोटो आला …. या वेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे समर्थक कैलाश फड यांच्या बरोबरचा हा फोटो. हेच कैलास फॅड व त्यांचे सुपुत्र हे 2024 च्या निवडणुकीत बूथ वर हैदोस घालत होते…
कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कैलास फड याचा व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर पोलिसांनी कैलास फड याच्यावर कारवाई केली होती. कैलास फड याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, न्यायलयाने 24 तासानंतर त्याला जामीन मंजूर केला होता. आता याच कैलास फडसोबत लक्ष्मण हाकेंचे फोटो अंजली दमानिया यांनी शेअर केले आहेत.
लक्ष्मण हाके धनंजय मुंडे यांच्या थेट समर्थनार्थ सरसावले आहेत. त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, अंजली दमानिया नावाची सोशल वर्कर आली. त्या ताईना माझं सांगणं, ऊसतोड कामगारांची पोर काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन अधिकारी झाले. गेल्या काही दिवसापासून हत्या करणाऱ्या आरोपींची जात शोधून विशिष्ट जातीला आरोपीच्या कठड्यात उभ करण्याचे काम बीड जिल्ह्यातील काही पुढारी करत आहेत..धस म्हणतो गँग ऑफ बीड म्हणतो, गँग ऑफ वासेपूर म्हणतो..ज्या वेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, महिला पोलिसांचा विनयभंग झाला, बीड जाळलं.. तेव्हा गँग ऑफ वासेपूर बीड नव्हत का?..
त्यावरून आता अंजली दमानिया यांनी हाके यांचे मुंडे समर्थक गुडांबरोबर फोटो पोस्ट करून हाके यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.