विशेष प्रतिनिधी
— अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या अर्जुन देशमुख (नाबाद 146) ची धडाकेबाज शतकी खेळी
पुण : परंदवाल स्पोर्टस क्लब, अचिव्हर्स क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून लायन्स क्लब पुणे रहाटणीच्या वतीने आयोजित लायन्स ज्युनियर लीग 13 वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
फोर स्टार मैदान हिंजवडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात संस्कार फेरे (5-20) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर परंदवाल स्पोर्टस क्लब संघाने एसएसए संघाचा 8 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात अर्जुन देशमुख (नाबाद 146धावा) याने केलेल्या शतकी खेळीसह सुदर्शन वाळके(5-3) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने क्रीक फायटर्स संघाचा 203धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
— निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
एसएसए: 25.2 षटकात सर्वबाद 82 धावा (विवान कडली 24, प्रथमेश राऊत 17, आशुतोष राऊत 13, संस्कार फेरे 5-20, अभिराज पाटील 1-9) पराभुत वि. परंदवाल स्पोर्टस क्लब: 18.2 षटकात 2 बाद 86 धावा (अण्वित तरडे नाबाद 30, अर्णव इंगळे 16, श्लोक मुसमदे नाबाद 15, विराज ढवळे 2-13); सामनावीर – संस्कार फेरे;
अचिव्हर्स क्रिकेट अकादमी: 45 षटकात 8 बाद 277 धावा (अर्जुन देशमुख नाबाद 146, सिध्देश जैस्वाल 52, अमेय देवस्थळी 16, स्वरीत पाटील 4-35, श्रेया तरस 1-26) वि.वि.क्रीक फायटर्स: 35.3षटकात सर्व बाद 74धावा(कृष्णराज पाटील 15, नील परदेशी 11, सुदर्शन वाळके 5-3, इशान देशमुख 2-16); सामनावीर – अर्जुन देशमुख.