पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.
जितेंद्र डूडी कनिष्ठ अधिकारी असल्याने पद अवनत करून त्यांच्याकडे पुणे जिल्हाधिकारी पदाचा भार सोपवण्यात आला आहे.
जितेंद्र डुडी Jitendra Dudi हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून ते 2016 मधील बॅचचे आयएएस IAS Officer अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये Zharkhand प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. केंद्र शासनाकडे Central Government सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र केडरकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या पत्नी पोलीस दलात आयपीएस अधिकारी आहेत.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत होते. त्यांनी मॉडेल स्कुल नावाची संकल्पना राबवली. ती राज्य शासनाने राज्यभर राबवली. त्याच प्रकारे स्मार्ट पीएसी ही संकल्पना राबवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुधारली. पाणीपुरवठा योजना पारदर्शी करण्यावर देखील त्यांनी भर दिला होता.