विशेष प्रतिनिधी
पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पाचव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गट साखळी फेरीत क गटात निखिल लूनावत(81धावा), अमेय भावे (71धावा), स्वप्निल फुलपगार (74धावा), आदित्य लोंढे (55 धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह आदित्य डावरे (4-18) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पारसी जिमखाना संघाचा 84 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत पीवायसी हिंदु जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 45षटकात 6बाद 312धावा केल्या. यात निखिल लूनावतने 68चेंडूत 4चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 81धावा, अमेय भावेने 98चेंडूत 9चौकारासह 71धावा केल्या. या सलामीच्या जोडीने 153चेंडूत 150धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघे एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकास फलंदाजीस उतरलेल्या स्वप्निल फुलपगारने 58चेंडूत 6चौकार व 4षटकाराच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. त्याला आदित्य लोंढेने 32चेंडूत 3चौकार व 4 षटकारासह 55 धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. पारसी जिमखाना कडून निनाद रॉड्रिक्सने 66 धावात 3 गडी बाद केला. 312 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पारसी जिमखाना संघाचा डाव 39.1षटकात सर्व बाद 228 धावावर संपुष्ठात आला. यात निनाद चौगुले 61, यशवंत काळे 48, यश बांबोळी 36, सिद्धार्थ करपे 20 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीवायसीकडून आदित्य डावरेने 18 धावात 4 गडी, स्वराज चव्हाणने 60 धावात 3 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर आदित्य डावरे ठरला.
न्यूझीलंडचा ऐतिहासिक विक्रम: एका टेस्ट डावात तीन फलंदाजांचे १५०+ धावा; ९५ वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरी (New Zealand’s Historic Feat: Three Batters Score 150+ in a Single Test Innings...
Read moreDetails