विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सोलापूर येथे आग लागून झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. ( Solapur fire victims get help from Prime Ministers National Relief Fund)
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की “महाराष्ट्रातील सोलापूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना.प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील.
सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सोलापुरातील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे साडेचार च्या सुमारास आग लागली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. भडकलेली आग व धूर यामुळे मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. शेवटी भिंत फोडून मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. बारा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमक दलास यश आ