विशेष प्रतिनिधी
Pune Crime पुणे : दोन गुन्हेगारी प्रवृत्तीचे मित्र एकमेकांना आपली पिस्टल दाखवत असताना चुकून मिसफायर झाले. त्यात एक मित्र जखमी झाला. हा प्रकार लपविण्यासाठी रस्त्यावरील भांडणातून गोळीबार होऊन जखमी झाल्याचा बनाव त्यांनी केला. मात्र पोलिसांच्या चाणाक्ष तपासातून हा प्रकार उघडकीस आला. ( A misfire resulted in a bullet, faked as a street brawl)
प्रदीप सावंत नावाचा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि बिबवेवाडीतील त्याचा मित्र असलेले तडीपार आरोपी कोंढव्यातील साळवे गार्डन येथे बसले होते. दोघांकडेही पिस्टल्स होत्या. एकमेकांना पिस्टल दाखवत असताना तडीपार आरोपीकडून मिसफायर होऊन सावंतला गोळी लागली. रात्री 9.30 च्या दरम्यान ही घटना घडली.
मात्र रुग्णालयात उपचारासाठी गेल्यावर खरा प्रकार उघडकीस येईल या भीतीने त्यांनी बनाव रचला. त्यासाठी स्टोरी तयार केली.
ती स्टोरी अशी होती की सातारा-पुणे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर झालेल्या किरकोळ वादातून मंगळवारी गोळीबार होऊन प्रदीप वसंत सावंत (वय 31, रा. सुखसागर नगर, नर्हे) हे रस्त्याने जात असताना भरधाव वेगात येणा-या होंडा स्प्लेंडर चालकाने त्यांना धडक दिली. यावरून त्यांच्यात बाचाबाची आणि शिवीगाळ झाली.वाद सुरू असताना स्प्लेंडरवर बसलेल्या दुचाकीस्वाराने सावंत यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. त्यात त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. सावंत यांना भूमकर चौकातील सिल्व्हर ब्रिज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पुण्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. त्यामध्ये सावंत याने आपल्यावर गोळीबार झाल्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले.