विशेष प्रतिनिधी
ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्यांचा जे लोक अपमान करतील त्यांची सर्व हिंदूंनी मुंडकी छाटली पाहिजे आणि काली मातेला त्याची माळ घातली पाहिजे. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड असतो, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे
ठाण्यातील साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कालीचरण महाराज उपस्थित होते. कालीचरण महाराज यांच्या हस्ते साईबाबा मंदिराच्या कलश पूजन सोहळा देखील पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना कालीचरण महाराज यांना राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त विधान बाबत विचारले. यावर बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्यांचा जे लोक अपमान करतील त्यांची सर्व हिंदूंनी मुंडकी छाटली पाहिजे आणि काली मातेला त्याची माळ घातली पाहिजे. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड असतो. आहे खास करुन ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं सार्थक करुन स्वतःच्या मुंडक्या उतरवा आणि जीव द्या. यातच स्वतःचे हिंदूंच कल्याण आहे.
कालीचरण महाराज म्हणाले, साई बाबा मुसलमान होते या प्रचार प्रसाराला बळी न पडता साई बाबांची भक्ती करावी. साई बाबा कट्टर हिंदू होते याचं मी प्रमाण दिलेलं आहे. जन्म आणि कर्माने साई बाबा हिंदू होते, हिंदू संस्कार आणि परंपरेत साई बाबांचा जन्म झाला. हिंदूंनी या षडयंत्रेला बळी न पडता कट्टर हिंदू राहून साई बाबांची भक्ती करावी आणि जगाचा उद्धार करावा
प्रयागराज कुंभमेळ्या बाबत कालीचरण महाराज म्हणाले, मी स्वतः जाऊन आलेलो आहे, तिथे व्यवस्था एकदम चोख आणि उत्तम आहे. हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. मी तिथे स्वतः राहून आलेलो आहे. तिथे धरपकड सुरू आहेत चांगलंच ठोकणे सुरू आहे त्या लोकांना, सत्य सर्वांन समोर येईल. सर्व उरलेल्या हिंदूंनी तिकडे जाऊन स्नान करावं आणि पुण्य प्राप्त करून घ्यावे.
संजय राऊत यांनी केलेल्या काळी जादू वक्तव्यावर ते म्हणाले, प्रत्येकाची आपआपली वक्तव्य आहेत. फडणवीसांनी काही वक्तव्य केलेले नाही आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही. तंत्र मंत्र असतात जादूटोणा असतात यात काही संशय नाही. असा जर कोणी करत असेल तर त्या त्यांच्या खाजगी गोष्टी आहेत
दिल्ली निकालावर भाजपचं अभिनंदन करताना कालीचरण महाराज म्हणाले, सर्व हिंदू जागृत होऊन हिंदुवादी सरकार निवडून देत आहेत. सर्व ठिकाणी असंच झालं पाहिजे. सर्व आमदार, खासदार, नगरसेवक कट्टर हिंदुवादी संसदेत, विधानसभेत, नगरपालिकेत गेले पाहिजेत. तेव्हा आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू. राजकारणात हिंदूकरणं करणं, हिंदूंची वोटर बँक बनणं, सर्वांनी जातीयवाद त्यागून छत्रपती शिवाजी महाराज्यांचा धर्म त्यांच्या ध्वजाखाली एकत्रित आणणे हेच हिंदूंच आद्य कर्तव्य आहे कट्टर हिंदूवादींना लोकसभेत, विधानसभेत राजकारणातल्या उच्चपदावर कट्टर हिंदूंना बसवणं हाच एक मात्र हिंदूंच्या सुरक्षेतेचा उपाय आहे.